29.1 C
Latur
Sunday, May 11, 2025
Homeअंतरराष्ट्रीयखलिस्तान समर्थकाच्या घरावर अंदाधुंद गोळीबार

खलिस्तान समर्थकाच्या घरावर अंदाधुंद गोळीबार

सरे : भारत-कॅनडामध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. यापूर्वी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येवरुन भारत-कॅनडाचे संबंध बिघडले होते. आता हरदीप सिंग निज्जरच्या साथीदाराच्या घरावर गोळीबार झाला. कॅनडाच्या मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, सिमरनजीत सिंगच्या घरावर गोळीबार झाला. घराच्या दरवाजावर तसेच दारात उभ्या असलेल्या गाडीवर गोळ्या झाडल्याच्या खुणा दिसत आहेत.

दक्षिण सरेमधील घरावर गोळीबाराची ही घटना घडली, असे रॉयल कॅनडीयन माऊंटेड पोलिसांनी सांगितलं. या गोळीबारात कोणीही जखमी झालेल नाही. या गोळीबारमागे काय उद्देश आहे? त्याचा शोध कॅनडा पोलिसांकडून घेतला जात आहे. २६ जानेवारीला व्हॅनकोव्युरमध्ये भारतीय दूतावासाबाहेर निदर्शने करण्यात आली. यामागे सिमरनजीत सिंग होता. त्या रागातून हा गोळीबार झाल्याचा आरोप आहे.

स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणारे दहशतवादी भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. कॅनडाच नव्हे तर, पाकिस्तानातही भारताविरोधी कारवाया करणा-या दहशतवाद्यांना वेचून-वेचून मारले जात आहे. सिमरनजीत सिंगच्या घरावर झालेल्या या गोळीबाराची आता सखोल चौकशी होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR