17.5 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीय‘इंडिया’ने झारखंडमध्ये सरकार वाचविले

‘इंडिया’ने झारखंडमध्ये सरकार वाचविले

राहुल गांधींची माहिती ३६ आमदार हैदराबादला

गोड्डा : झारखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. सर्वप्रथम मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे दिल्लीला गेले आणि बेपत्ता असल्याचे समजले. त्यानंतर त्यांना ईडीने अटक केली. झारखंडमध्ये सरकार कोसळणार अशी चर्चा रंगू लागली. त्यात चंपई सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली, तरी राज्यातील राजकीय तापमान शांत झालेले नाही. ३६ आमदारांना हैदराबादला हलवण्यात आले आहे. कारण महाआघाडीचे आमदार फोडण्याचा धोका आहे.

या दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक दावा केला आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीमुळेच झारखंडमध्ये सरकार पाडण्यात भाजपाला यश मिळाले नाही असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, झारखंडमधील जनतेने दिलेला जनादेश वाया घालवण्यापासून भाजपाला रोखण्यात इंडिया आघाडी यशस्वी झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आपल्या भारत जोडो न्याय यात्रेला शनिवारी झारखंडमधील गोड्डा येथील सरकंदा चौकातून सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी विधान केले.

भाजपने मनी पॉवर आणि तपास यंत्रणांचा वापर केला. आम्ही भाजपला घाबरत नाहीत आणि फुटीर विचारसरणीशी लढत राहतो. पूर्वीची भारत जोडो यात्रा आरएसएस आणि भाजपच्या विभाजनकारी अजेंड्याच्या विरोधात होती, परंतु सध्याची यात्रा देशातील जनतेला न्याय देण्याची मागणी करणारी आहे. झारखंडमध्ये निवडून आलेले सरकार अस्थिर करण्याचा भाजपने प्रयत्न केला. पण इंडिया आघाडीने तसे होऊ दिले नाही असे राहुल गांधी स्पष्ट शब्दांत म्हणाले.

जनादेश चोरू दिला नाही
ते पुढे म्हणाले, भारत आघाडीने पक्षाला जनादेश चोरू दिला नाही. महागाई आणि वाढती बेरोजगारी यासह देशभरात मोठ्या प्रमाणावर अन्याय दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारतात तरुणांना रोजगार मिळणे अशक्य आहे. देशातील बेरोजगारीचा दर ४० वर्षांतील सर्वाधिक आहे. तुमची मन की बात आम्ही ऐकतो, पण आमच्या मनात जे आहे ते तुम्ही सांगू नका, आमचे ऐकत चला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR