ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील ‘नाद’ या बंगल्यात रात्री बॉम्ब असल्याचा एक निनावी फोन कॉल आला होता. त्यामुळे रात्री खळबळ उडाली. हा फोन आल्यानंतर बॉम्बशोधक विभागाने मध्यरात्री १२ वाजता तपासणी केली. पण, तपासात काहीही सापडले नाही. दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आव्हाड यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता होती, अशा प्रकारे त्यांनी ट्वीट देखील केले होते. या फोनमुळे ठाणे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. या फोननंतर अचानक आव्हाड यांच्या घरी खळबळ उडाली.
यासंबंधी अज्ञाताविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा बंगल्यात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा माहिती सापडली नाही. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांना त्रास देणारी नेमकी व्यक्ती कोण याचा पोलिस शोध घेत आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी केले होते ट्वीट
दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये दिसत असलेला माणूस आणि त्याच्यासोबत असलेला आणखी एक गृहस्थ व्हीडीओ कॉलवर कुणाशी तरी बोलत होते. मला मारण्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा सुरू होती. ती एका पत्रकाराने ऐकली अन् माझ्यासोबत असणा-या पोलिस आणि मुलांना सांगून सावध केले.