25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रअ. भा. म. साहित्य संमेलनात पडला कवितांचा पाऊस

अ. भा. म. साहित्य संमेलनात पडला कवितांचा पाऊस

साने गुरुजी साहित्यनगरी, अमळनेर (जि. जळगाव) : पूज्य साने गुरुजींच्या वास्तव्याने पावन झालेल्या भूमीवर कविमनांच्या काव्यप्रतिभेला धुमारे फुटणार नाहीन, असे कधी होणार नाही. ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ यानुसार वेगवेगळी कविसंमेलने आणि कवीकट्टा कार्यक्रमांना रसिकांनी दिलेल्या टाळ्यांनी चांगलेच रंगले.

शनिवारी सायंकाळी सभामंडप दोनमध्ये कविसंमेलन उत्साहात पार पडले. प्रकाश केटुजी होळकर, लासलगाव अध्यक्षस्थानी होते. या कविसंमेलनात गीतेश शिंदे-ठाणे, मेघना साने-ठाणे, प्रथमेश किशोर पाठक-ठाणे, कीर्ती पाटसकर कांदिवली, वैभव अशोक व-हाडी-वाशी, सुजाता राऊत-ठाणे, नरसिंह इंगळे- चिखलठाणा, अभय दाणी-छ. संभाजीनगर, भारत सातपुते- लातूर, आशा डांगे- छ. संभाजीनगर, माधुरी चौधरी-छ. संभाजीनगर, हबीब भंडारे- छ. संभाजीनगर, कविता मुरूमकर-सोलापूर,

धनंजय सोलंकर-पुणे, देवा झिंजाड-पुणे, कांचन प्रसाद संगीत-नवी मुंबई, चैतन्य मातुरकर-ब्रह्मपुरी, नरेंद्र कन्नाके- वरोरा, राम वासेकर- गडचिरोली, गणेश भाकरे-सावनेर, अमोल गोंडचवर- मलकापूर, हर्षदा कुलकर्णी-पठाडे, पौर्णिमा राजेंद्र केरकर – गोवा, माधुरी खर्डेनवीस-भोपाळ, आनंद हिरालाल जाधव, बिदर, डॉ. संजीवकुमार सोनवणे- धरणगाव, बी. एन. चौधरी- धरणगाव, रतन पिंगट- लासलगाव, मीनाक्षी पाटील-मुंबई, मारुती कटकधोंड- सोलापूर, जिजा शिंदे- छ. संभाजीनगर, प्रा. सुमती पवार- नाशिक, गणेश खारगे- कुंडल, रवींद्र लाखे या कवींनी आपल्या कविता सादर केल्या. अजीम नवाज राही (साखरखेर्डा) यांनी सूत्रसंचालन केले.

खान्देशी कविसंमेलन
शनिवारी सायंकाळी सभामंडप-३ बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहात खान्देशी कविसंमेलन चांगलेच रंगले. ज्येष्ठ कवी कृष्णा पाटील अध्यक्षस्थानी होते. यात नंदुरबारचे ज्येष्ठ पत्रकार-साहित्यिक रमाकांत पाटील यांनी शेतक-यांच्या जीवनावर आधारित ‘आत्महत्या’ ही कविता सादर केली. ‘अरे माझ्या दोस्ता, हो तू आता शहाणा, अपयशापायी मरणाचा नको करू तू बहाणा’ ही लक्षवेधी कविता सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यासोबतच जळगावच्या ज्येष्ठ कवयित्री पुष्पा साळवे यांनी ‘सद्य:स्थिती’वर आधारित ‘बाईपण’ ही कविता सादर केली. जळगावच्याच कवयित्री यांनी ‘देव दगडाचा’ ही कविता सादर केली. याशिवाय मराठी गझलकार डॉ. संगीता म्हसकर यांनी विविध तीन गझल सादर केल्या. त्यात ‘वा-यावरती उडून गेले, फूल गुलाबी सुकून गेले, गुन्हा असावा लाटेचा हा, नाव आपले पुसून गेले’ या गझलेने लक्ष वेधून घेतले. याशिवाय ज्ञानेश्वर शेंडे, एरंडोलचे नामवंत साहित्यिक आणि गझलकार प्रा. वा. ना. आंधळे,

अ‍ॅड. विलास कांतीलाल मोरे, मुक्ताईनगरचे अ. फ. भालेराव, अमळनेरच्या सुनीता रत्नाकर पाटील व गोकुळ बागुल, चाळीसगावचे दिनेश चव्हाण, नगरदेवळ्याचे गो. शि. म्हसकर, याशिवाय सुभाष पाटील (घोडगावकर), निरेंद्र खैरनार, एस. के. पाटील, महेंद्र पाटील, वि. ना. बागूल, वीरेंद्र बेडसे, जगदीश पाटील, अरुण सोनटक्के, संजय वाघ, विनोद गोरवाडकर, प्रभा बैकर, शिवानी मुळे, कृपेश महाजन, किशोर काळे, राजश्री मोरे, विलास पाटील खेडीभोकरीकर, ज्ञानेश्वर भामरे, बाहुबली बारकुट, शरद पाटील, राजेंद्र कांबळे, डॉ. राजेश गायकवाड, प्रा. राजश्री चव्हाण या कवींनी आपापल्या कविता सादर करत कविसंमेलनाचा आनंद घेतला. जगदीश देवपूरकर यांनी सूत्रसंचालन केले.
‘आठवणीतल्या कविता – रसास्वाद’
शनिवारी दुपारी सभामंडप : एकमध्ये खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर ‘आठवणीतल्या कविता – रसास्वाद’ हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी अशोक बागवे, ठाणे (मंगेश पाडगावकर) होते. यात किरण येले (शांता शेळके) अंबरनाथ, श्रीधर नांदेडकर (बी. रघुनाथ) – छ. संभाजीनगर, संजीवनी तडेगावकर (ना. धों. महानोर) – जालना, डॉ. माहेश्वरी वीरसिंग गावीत (कुसुमाग्रज) – अहमदनगर, मीना संजय शिंदे (केशवसुत)- पुणे, प्रमोदकुमार अणेराव (सुरेश भट)- भंडारा, श्याम माधव धोंड (कवी अनिल)-नागपूर, पौर्णिमा हुंडीवाले (भा. रा. तांबे) ब-हाणपूर यांनी कवी आणि त्यांच्या कवितांविषयी विविध अंगांनी माहिती दिली. संजय बारी यांनी सूत्रसंचालन केले.

राज्यभरातील कवींनीही सादर केल्या कविता
शुक्रवारी सायंकाळी उशिरा सभामंडप एकमध्ये कविसंमेलन चांगलेच रंगले. यात इंद्रजित भालेराव यांनी ‘माईचा सोडून धरला पदर अशांची कवितेत कधीच केली नाही कदर’ अशा पुरुषांपासूनच कवितेला भीती होती, म्हणूनच ७०० वर्षे कविता जात्याभोवती जिती होती.. या स्वरचित कवितेतून काव्य प्रतिभेचा नवा हुंकार फुंकला आणि रसिकांनी त्याला दाद दिली. इंद्रजित भालेराव यांच्यापासून सुरू झालेल्या या काव्यप्रवासात अशोक नीळकंठ सोनवणे (चोपडा), डॉ. विद्या देशपांडे, रमेश पवार (अमळनेर), सतीश सोळांकुरकर (ठाणे), दुर्गेश सोनार (नवी मुंबई), संगीता अरबुने (वसई), संकेत म्हात्रे (ठाणे), नामदेव कोळी (वांद्रे), शिवाजी गावडे (ठाणे), इंद्रजित भालेराव (परभणी), विष्णू सुरासे, भास्कर पाटील, सुनीता कावसानकर (छत्रपती संभाजीनगर), बालाजी इंगळे (उमरगा), दिनकर जोशी (अंबाजोगाई), अमृता नरसाळे (रत्नागिरी), प्रा. प्रदीप कांबळे (सातारा), प्रा. अशोक वाबळे (चाळीसगाव), डॉ. विद्या देशपांडे (सोलापूर), अजित मालंडकर (कल्याण), वर्षा ढोके (सावनेर), डॉ. संघमित्रा खंडारे (दर्यापूर), दीपक आसेगावकर (पुसद), सुरेश साबळे (बुलडाणा), सावन धर्मपुरीवार (हैदराबाद), व्यंकटेश कुलकर्णी (हैदराबाद), प्रा. मीनाक्षी पाटील काळे (बिदर), राजू नाईक (तिसवाडी), अशोक शिरोडे (बिलासपूर), वैजयंती दांडेकर (वडोदरा), जया गाडगे (इंदूर), अशोक कोतवाल, प्रकाश किनगावकर, शशिकांत हिंगोणेकर (जळगाव), रावसाहेब कुवर (साक्री), दीपक पाटील- चोपडा (नाशिक), डॉ. कुणाल पवार (अमळनेर), राजेसाहेब कदम (अहमदपूर) यांनी विविध विषयांचे यथार्थ चित्रण करून आपल्या प्रगल्भ काव्य प्रतिभेचे दर्शन घडविले. अध्यक्षस्थानी कवी देविदास फुलारी (नांदेड) होते. कवी संजय चौधरी (नाशिक) यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR