सोलापूर – बहुजन समाजातील जेष्ठ नागरिकांच्या आत्म सन्मानासाठी ज्येष्ठ नागरिक असोसिएशनची स्थापना समाज कल्याण सभागृह सोलापूर येथे करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर वकील संघाचे अध्यक्ष ॲड .सुरेश गायकवाड ,ज्येष्ठ वकील संजीव सदाफुले ,डी.सी.सी .बँकेचे जे. टी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ॲड .सुरेश गायकवाड यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत ज्येष्ठ नागरिकांनी आता जबाबदारीचं ओझ झुगारून स्वतःच्या आत्मसन्मानासाठी व आनंदासाठी जगलं पाहिजे, शिवाय समाजात “महा – तारे”म्हणून मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिले पाहिजे, असे सांगून संस्थेला आवश्यक ती कायदेशीर मदत करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले . यावेळी ॲड .संजीव सदाफुले, जे.टी. पाटील यांनी देखील या नव्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव ननवरेहे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शब्बीर मुजावर यांनी सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. संस्थेचे संस्थापक सरदार यांनी संस्थेची ध्येय धोरणे विशद केली, तर पठाण सर यांनी जेष्ठ नागरिकांच्या हिताचे पाच ठराव मांडून पहिल्या सभेत त्यास मंजुरी घेतली या स्थापनेच्या पहिल्याच सभेला वैराग, नान्नज, कौठाळी, दारफळ ,रानमसले ,सोलापूर शहर आदी विविध भागातून ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते .सदरहू कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी मो हुसेन डोका , बाळासाहेब पाटील कवठाली , मिलिंद प्रक्षाले , शफी कुडले , कचूरभाई मुल्ला , मोतीलाल शेख , सिंकंदर नादाफ , अ. रजाक शेख यांनी परिश्रम घेतले. जे डी पाटील , डॉ लवंगे , अ. रशिद सरदार , घोडके सर यांनी मार्गदर्शन केले. इमाम शेख सर सर्वांचे आभार मानले .अब्दुल मतीन वळसंगकर यांनी सूत्रसंचलन केले.