लातूर : विनोद उगीले
उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये अंधश्रद्धेतून बक-याचा बळी दिल्याच्या चर्चेने खळबळ उडाली असतानाच बुधवारी दुपारी या प्रकरणाचा तपास करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत यांनी प्राथमिक तपासात हा प्रकार अंधश्रद्धेचा दिसून येत नाही अशी माहीती सोशल मिडियाद्वार दिली आहे. तर चारचाकी गाडीच्या पार्टीच्या बडेजावासाठी ठाण्यातील एका दुय्यम अधिका-याने पोलीस ठाण्याच्या गेटवर बकरा बळीचे फोटो शूट! करून अधिकारी सहकारी व मित्र परीवारास पार्टीस निमंत्रीत केल्याची माहीती समोर येत आहे तशी चर्चा ही सुरू आहे. मात्र या पार्टीचे आयोजन करणा-या अधिका-यास व या पार्टीतील मटनावर ताव हाणणा-यांच्या हे प्रकरण चांगलेच अंगलट येण्याची शक्यता आहे.
या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहणा-या उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यातील गेटवर अंधश्रद्धेतून बक-याचा बळीच्या चर्चेने जिल्हाच नव्हेतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. प्रत्येकाला या घटनेच्या उलगड्याची उत्सुकता लागून राहीली आहे. पोलीस प्रशासनातील वरिष्ट अधिका-यांकडून या घटनेची चौकशी सुरू आहे. चौकशी दरम्यानच बुधवारी दुपारी या प्रकरणाचा तपास करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत यांनी प्राथमिक तपासात हा प्रकार अंधश्रद्धेचा दिसून येत नाही अशी माहीती सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हिडीओद्वारे दिली आहे.
असे असताना सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गेट मधील बकरा बळीच्या फोटोच काय? याची उत्सुकता प्रत्येकाला लागली असून या बाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ठाण्यातील एका दुय्यम अधिका-याने जवळपास दोन महिन्यापूवी हुंदाई कपंनीची जुनी वापरातील एक चारचाकी वाहन खरेदी केले होते. त्याबद्दल ठाण्यातील काही अधिकारी, कर्मचारी त्यांच्याकडे वारंवार पार्टीची मागणी करीत होते. त्यामुळे त्यांनी दि. ३१ जानेवारी राजी पार्टीचा बेत ही आखला व त्याचे नियोजन दि. ३० जानेवारी रोजीच केले. दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजणेच्या सुमारास ते ठाण्यात आले असता त्यांना ठाण्या समोरून बोकूड घेऊन जाणारा व्यक्ती दिसला.
त्यानी त्यास बोकडासह बोलावून घेऊन ठाण्याच्या गेट मघ्ये बकराबळीचे फोटो शूट! केले व तो फोटो ठाण्याच्या कर्मचा-यांचा वाटसप ग्रुपवर तो शेअर करून बोकड कापला आहे. जेवायला या असे निंमत्रित केल्याचे ठाण्यातील कर्मचा-यांच्या आदींच्या चर्चेतून समोर येत आहे. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस अधिका-यांकडून सुरू असून सत्य काय ते लवकरच समोर येणार आहे. मात्र हे प्रकरण त्या पार्टीतील मटनावर ताव हाणणा-यांच्या चांगलेच अंगलट येण्याची शक्यता आहे.