28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeधाराशिवदारूबंदीसाठी महिला सरसावल्या, ग्रामपंचायतीला लावले कुलूप

दारूबंदीसाठी महिला सरसावल्या, ग्रामपंचायतीला लावले कुलूप

नायगाव : नायगाव ( ता. कळंब ) येथे खुलेआम अनधिकृत दारूचे व्यवसाय सुरू आहेत. या दारूमुळे अनेकांचे प्रपंच उघड्यावर आले आहेत. याचा नाहक त्रास सामान्य महिलांना सहन करावा लागत असल्याने तरुणांसह महिलांनी गावातील बेकायदेशीर दारूचे अड्डे उध्वस्त करा अशी मागणी धाराशिवच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यावर कार्यवाही न झाल्याने दारूबंदीसाठी महिलांनी ग्रामपंचायतीला कुलूप लाऊन बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

गावातील महिला तरुण एकत्रित येत सकाळी नऊ वाजता ग्रामपंचायत कार्याला नायगावला प्रथम टाळे लावून जोपर्यंत गावाच्या परिसरातून दारू हद्दपार होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय उघडू देणार नसल्याचा निर्धार महिला व ग्रामस्थांनी केला आहे.

अशा आहेत मागण्या
गावातील अनाधिकृत दारूचे पाच अड्डे पोलिसांनी उध्वस्त करावेत, याच बरोबर दारू विक्रेत्यांना हद्दपार करावे, गावाभोवती असलेल्या शाळे भोवती खुलेआम पणे दारू मटका व जुगार खेळला जातो यावरही पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी येथे करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR