मुंबई : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अखेरीस भाजपवासी झाले आहे. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चव्हाण यांनी प्रवेश केला आहे. पण यावेळी सगळ्यांचे आभार मानत असताना चव्हाणांनी आशिष शेलार यांचा उल्लेख मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असा केला. त्यामुळे कार्यालयात हश्शा पिकला.परंतु लागलीच फडणवीसांनी ती चूक लक्षात आणून दिली.
दरम्यान, मुंबईतील भाजपच्या मुख्यालयामध्ये अशोक चव्हाण यांचा प्रवेश सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यावेळी उपस्थितीत होते. या प्रवेशानंतर चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली.
पुढे बोलताना चव्हाण आपली चूक दुरुस्त करत म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई काँग्रेसचे….सवयीचा भाग आहे, गेल्या ५० वर्षांची सवय आहे…मुंबई भाजपचे आशिष शेलार…भाजपच्या कार्यालयात पहिलीच पत्रकार परिषद आहे, कालच प्रवेश झाला आहे. त्यामुळे सांभाळून घ्या. अचानक स्विच झाल्यामुळे हे झाले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा आणि अनेक भाजपचे कार्यकर्ते यांनी माझ्या प्रवेशासाठी प्रयत्न केले आहे. त्या सगळ्यांचे आभार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा आहे, एकमेकांना मदत करत आलो आहे. आज मी माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करत आहे. इतकी वर्ष गेल्या ३८ वलर्षांचा राजकीय प्रवास हा बदलत आहे. आज भारतीय जनता पक्षात मी प्रवेश करत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली स्मृती आणि प्रेरणा घेऊन मी काम करत आहे. ते देशाच्या आणि राज्याच्या विकासात योगदान देण्यासाठी मी प्रवेश केला आहे असे चव्हाण म्हणाले.