24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeक्रीडाभारतीय कुस्ती महासंघावरील निलंबन अखेर घेतले मागे

भारतीय कुस्ती महासंघावरील निलंबन अखेर घेतले मागे

नवी दिल्ली : युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघावरील निलंबन तात्काळ मागे घेतले आहे. त्यामुळे भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे. मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आले होते. अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेतल्याचे कारण यासाठी देण्यात आले होते. या संदर्भात युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये निलंबित करण्यात आले होते. कारण भारतीय संस्था वेळेवर निवडणुका घेण्यात अयशस्वी ठरली होती. युडब्ल्यूडब्ल्यू शिस्तपालन चेंबरने निर्णय घेतला होता की महासंघावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी हे पुरेसे कारण आहे. कारण फेडरेशनमधील ही परिस्थिती कमीत कमी सहा महिने जैसेथे अशीच होती.

दरम्यान, निलंबनाचा आढावा घेण्यासाठी ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत युनायटेड वर्ल्ड रेसलिंग अधिका-यांनी काही अटी घालत निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR