22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeपरभणीताडकळस जि. प. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

ताडकळस जि. प. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

ताडकळस : येथील जिल्हा परिषद प्रशालेतील एन. एम. एम. एस. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक एस. एस. गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून सपोनि.कपिल शेळके, पत्रकार सुरेश मगरे, मारोती मोहिते, दिपक आंबोरे, अनिल आंबोरे, शंकर सोळंके, साळवे आदींची उपस्थिती होती.

येथील जिल्हा परिषद प्रशालेतील इयत्ता ८वीत शिकणारा विद्यार्थी आशिष बालाजी वाव्हळे हा एम .एन. एन.एस परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल आई-वडिलांसह त्याचा सन्मान करण्यात आला. सपोउपनि.कपिल शेळके यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे शंकर सोळंके, अनिल अंबोरे, बालाजी वाव्हळे, पंचशीला वाव्हळे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अर्चना जानगेवाड, बाबुराव मुकनर, मारुती डोईफोडे, माधव पवार, सविता मुरमुरे, गोपाल देसाई, पार्वती शिवणकर आदीनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR