24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रभुजबळांनी जाती-जातींमध्ये संभ्रम निर्माण करु नये

भुजबळांनी जाती-जातींमध्ये संभ्रम निर्माण करु नये

शंभूराज देसाई आक्रमक

मुंबई: मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारमध्ये असूनदेखील सरकारवर आक्षेप घेतले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही, याचा विचार सरकारने केला आहे. त्यांचे कालचे विधान आश्चर्यकारक असल्या विधान शंभूराज देसाई यांनी केले आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी मराठावाडा दौ-यावर असताना मनोज जरांगे पाटील, शिंदे समिती आणि सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्याला आज मंत्री शंभूराज देसाई यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.
शंभूराज देसाई म्हणाले की, भुजबळांनी आक्षेप घेतला की माजी न्यायमूर्ती गायकवाड साहेब अंतरवालीमध्ये कसे गेले, त्यांनी तिथे सर.. सर केले. परंतु तसे नाहीये. सरकराने सांगितल्यानंतर दोन्ही माजी न्यायमूर्तींनी तिथे गेले होते. भुजबळांनी ओबीसींमध्ये गैरसमज निर्माण करु नये.

देसाई पुढे बोलले, महाराष्ट्रामध्ये जाती-जातींमध्ये संभ्रम निर्माण होईल, असं विधान भुजबळांनी करणे चुकीचे आहे. यामुळे राज्यात परिस्थिती खराब होऊ शकते. आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहोत. कदाचित उद्याच मंत्रिमंडळाची बैठक होईल, त्यामध्ये आम्ही चर्चा करु.

‘जबाबादार आणि वरिष्ठ मंत्र्यांची हे वक्तव्य आश्चर्यकारक आहे. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देण्याचे ठरलं होते.. मंत्रिमंडळात तशी चर्चा झाली होती’ असे स्पष्टीकरण शंभूराज देसाई यांनी दिले आहे.

काय म्हणाले होते छगन भुजबळ?
सोमवारी बीडच्या दौ-यावर असलेल्या छगन भुजबळांनी जाळपोळीची पाहाणी केल्यानंतर छत्रपती संभाजी नगर येथे जात पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये ते म्हणाले की, सरकारच्या शिंदे समितीवर आमचा आक्षेप आहे. माजी न्यायमूर्ती जरांगेंच्या भेटीला जातात, हे चुकीचं आहे. आमचे मंत्री, आमदार जरांगेंच्या भेटीला जताता त्यांना ओबीसींची मते नको आहेत काय? गुन्हा मागे घेण्याची मागणी करणे आणि गुन्हे मागे घेणे हे चांगले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR