कुपवाडा : काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या ४१ राष्ट्रीय रायफल येथे बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. कार्यक्रमास जम्मू -काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, असा त्यांचा आदेश होता. त्यांच्यासाठी जनता सर्वप्रिय होती. आजचा ऐतिहासिक दिवस आहे. मला विश्वास आहे की शत्रूंच्या छातीत देशाचा तिरंगा गाडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा सैनिकांना प्रेरित करेल त्यांना उर्जा देईल.
आम्ही पुणेकर संस्था आणि ४१ राष्ट्रीय रायफल मार्फत हा पुतळा स्थापन करण्यात आला. मला अनेक सैनिकांनी सांगितले. आमची घोषणा आहे बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय, या घोषणेमुळे अंगावर शहारे येतात, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
आपले सैनिक सीमेचे रक्षण करतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातात तलवार आहे. तलावरीचे टोक आहे त्या बाजुला पाकिस्तान आहे. आता ही तलवार पाकिस्तानला सळो की पळो करुन सोडणार. त्यांची आपल्या देशाकडे बघण्याची हिंमत देखील होणार नाही, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.