24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरदेशातील लोकशाही वाचवण्यासाठी युवापिढीने विलासरावांची प्रेरणा घेऊन काम करावे

देशातील लोकशाही वाचवण्यासाठी युवापिढीने विलासरावांची प्रेरणा घेऊन काम करावे

लातूर : प्रतिनिधी
आज देश कठीण परिस्थितीतून जात आहे. छत्रपती राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार संपवण्याचा प्रयत्न होत आहे. या परिस्थितीत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सारख्या नेतृत्वाची प्रेरणा घेऊन राज्यघटना आणि देशातील लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून पूढे येण्याचे आवाहन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानभाऊ पटोले यांनी केले.

लातूर तालुक्यातील वैशालीनगर निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना येथे उभारण्यात आलेल्या माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व ‘विलास भवन’ कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास रविवार दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी मोठ्या थाटात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंतराव पाटील, अखिल भारतीय आदिवासी काँग्रेस कमिटी अध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, सिने अभिनेते रितेश देशमुख, लातुर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, माजी राज्यमंत्री विश्वजित कदम, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुरेश वरपूडकर, माजी आमदार अभिजित वंजारी, सौ. सुवर्णताई दिलीपराव देशमुख, ट्वेन्टी वन अ‍ॅग्री लि. संचालिका सौ. अदिती अमित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, विरोधी पक्षाची फोडाफोडी करुन लोकशाही कमकूवत करण्याचे काम भाजपाकडून होत आहे. अलीकडेच काँग्रेसमध्ये अशी एक फुट पडली आहे. परंतू गटातटाच्या राजकारणातील एक तट बाजूला गेल्यामूळे आता काँग्रेस अधिक मजबूत झाली आहे. ‘काँग्रेस संपवणारे संपतील पण काँग्रेस कधी संपली नाही’, असे आपले नेते विलासराव देशमुख नेहमी सांगत असत. पक्षातील नवतरुणांनी आपल्या नेत्याचे आदर्शसमोर ठेऊन आजपासून कामाला लागावे. जेणे करुन राज्यात पून्हा काँग्रेस सत्तारुढ झालेली आपल्याला पाहयला मिळेल.

अमित देशमुख यांनी महाराष्ट्राच्या नेतृत्वासाठी पुढे यावे
या भावनिक आणि कौटूंबिक सोहळ्यात विश्वजीत कदम व सतेज पाटील यांनी अमितभैय्या यांनी आता महाराष्ट्राभर दौरा काढला पाहिजे. महाराष्ट्राच्या नेतृत्वासाठी पुढे आले पाहिजे, असे मत व्यक्त केले. हाच धागा पकडून काँगे्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात आम्ही ज्येष्ठ असलो तरी काँग्रेसला तरुण नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे अमित देशमुख यांनी महाराष्ट्राच्या नेतृत्वासाठी पुढे यावे, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरणे उभे आहोत. महाराष्ट्रात विलासराव देशमुख यांच्या विचाराचा जागर मांडून काँग्रेस मजबुत करणे हीच विलासराव देशमुख यांना खरी आदरांजली ठरेल, असेही पटोले व थोरात म्हणाले. तेव्हा सोहळ्यास उपस्थित हजारों नागरीकांनी टाळ्यांच्या कडकडाटात समर्थन दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR