24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeक्रीडामहिला प्रीमियर लीगच्या उद्घाटनात कार्तिक आर्यन करणार परफॉर्म

महिला प्रीमियर लीगच्या उद्घाटनात कार्तिक आर्यन करणार परफॉर्म

नवी दिल्ली : महिला प्रीमियर लीगचा (डब्ल्यूपीएल) दुसरा हंगाम २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिला सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी बीसीसीआय एक शानदार उद्घाटन सोहळा आयोजित करणार आहे. त्यामध्ये बॉलिवूडचे कलाकार भाग घेणार असून प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन आपला परफॉर्म सादर करणार आहे.

१३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता हा उद्घाटन सोहळा सुरू होणार आहे. यामध्ये कार्तिक आर्यनसह अनेक बॉलिवूड स्टार्स दिसणार आहेत. गेल्या वेळी, कियारा अडवाणी आणि क्रिती सेनॉन सारख्या स्टार्सने उद्घाटन समारंभात परफॉर्म केले होते. तर गायक एपी धिल्लन यांनी आपल्या गाण्यांनी चाहत्यांची मने जिंकली होती. या स्पर्धेत २३ फेब्रुवारी ते १७ मार्च या दरम्यान पाच संघामध्ये २२ सामने खेळले जाणार आहेत. गेल्या वर्षी ही लीग मुंबई आणि नवी मुंबईच्या दोन स्टेडियममध्ये खेळवण्यात आली होती. मात्र, यावेळी या लीगचे यजमानपद मुंबईऐवजी बंगळुरू आणि दिल्लीला देण्यात आले आहे. तर फायनल दिल्लीत होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR