20.7 C
Latur
Saturday, November 16, 2024
Homeमहाराष्ट्रपंतप्रधान मोदींच्या सभास्थळी मंडप कोसळला, चौघे जखमी

पंतप्रधान मोदींच्या सभास्थळी मंडप कोसळला, चौघे जखमी

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या बुधवारी २८ फेब्रुवारीला यवतमाळ येथे महिला मेळाव्यासाठी येत आहेत. त्यांच्या कार्यक्रमासाठी यवतमाळनजीक भारी शिवारात येथे भव्य मंडप उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सभामंडपाचे काम सुरू असताना त्यातील एक भाग कोसळल्याने चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज, रविवारी दुपारी घडली.

भारी येथील मैदानावर बचत गटाच्या महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ४२ एकर खुल्या जागेवर हा मेळावा होणार असून २६ एकरवर सभा मंडप उभारला जात आहे. त्यातील एक डोम उभा करण्याचे काम सुरू असताना त्याचा पिलर जमिनीतून निखळला त्यामुळे त्याचे खांब खाली असलेल्या तीन क्रेन वर कोसळले. या घटनेत चार कामगार जखमी झाले असून सुदैवाने ते बचावले. जखमी मजुरांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याठिकाणी जवळपास तीन लाख महिला उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी स्टेज, मंडप, पार्किंग, बैठक व्यवस्था, पाणी व्यवस्था, सुरक्षा आदींचा गिरीश महाजन यांनी आढावा घेतला. मंडप उभारणीच्या कंत्राटदारांकडून उभारणीच्या कामाची माहिती घेतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR