18.9 C
Latur
Saturday, November 16, 2024
Homeमुख्य बातम्याड्रायव्हर विना तब्बल ८४ किमी धावली ट्रेन; चौकशीचे आदेश

ड्रायव्हर विना तब्बल ८४ किमी धावली ट्रेन; चौकशीचे आदेश

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ रेल्वे स्थानकावर थांबलेली एक मालगाडी अचानक पठाणकोटच्या दिशेने रवाना झाली. मोठा उतार असल्याने ट्रेन आपोआपच ड्रायव्हरशिवाय सुरू झाली. तब्बल ८४ किमीपर्यंत ही ट्रेन ड्रायव्हरविना धावली. या घटनेने रेल्वे अधिका-यांमध्ये गोंधळ उडाला. पंजाबच्या मुकेरिया येथे उंच मार्गावर ही ट्रेन थांबवण्यात रेल्वे प्रशासनाल यश आले. याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून तपास सुरू असल्याचे जम्मूचे डिव्हीजनल ट्रॅफिक मॅनेजरने दिली.

जम्मूतील कठुआ येथे रविवारी सकाळी ७.१० वाजता ही घटना घडली. स्टेशनवर ट्रेनचा ड्रायव्हर गाडीतून उतरुन चहा पिण्यासाठी खाली आले होते. याचवेळी रुळावर उतार असल्याने गाडीने अचानक वेग धरला आणि ड्रायव्हर विना ही ट्रेन धावत सुटली. या मालगाडीतून काँक्रीट नेण्यात येत होते, जे कठुआ स्टेशनवरुनच भरण्यात आले होते. जेव्हा ट्रेनचा चालक आणि सहचालक चहा पिण्यासाठी ट्रेनमधून खाली उतरले तेव्हा गाडीचे इंजिन सुरूच होते. याचदरम्यान, सकाळी ७.१० वाजता अचानक रेल्वे धावत सुटली. ट्रेनमधून उतरण्यापूर्वी चालकाने हँडब्रेक लावला नव्हता, अशी सुत्रांची माहिती आहे.

दसूहा येथील उंचीवरील रेल्वे मार्गावर ही ट्रेन थांबवण्यात रेल्वेच्या अधिकारी व कर्मचा-यांना यश आले. मात्र, तोपर्यंत या ट्रेनने ८४ किमीचे अंतर पार केले होते. सुदैवाने या प्रवासादरम्यान, रेल्वे ट्रॅकवर इतर कुठलीही ट्रेन नव्हती. त्यामुळे, मोठा अनर्थ टळला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR