29.7 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeराष्ट्रीयगगनयान मोहिमेतील ४ अंतराळवीरांची नावे जाहीर

गगनयान मोहिमेतील ४ अंतराळवीरांची नावे जाहीर

तिरुवनंतपुरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये इस्रोच्या तीन प्रमुख तांत्रिक विभागांचे उद्घाटन केले. यावेळी मोदींनी तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई आंतराळ केंद्राचा दौरा केला. यावेळी मोदींनी गगनयान मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच गगनयान मोहिमेशी संबंधित अंतराळवीरांची भेट घेतली. त्यानंरत इस्त्रोच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील अंतराळवीरांची नावेही समोर आली आहेत.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांच्या नावांचीही घोषणा केली. ग्रुप कॅप्टन प्रशांत बालाकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप, ग्रुप कॅप्टन अजीत कृष्णन आणि ंिवग कमांडर शुभांशू शुक्ला हे गगनयान मोहिमेसाठी निवडलेले अंतराळवीर आहेत. यावेळी मोदींनी ही वेळही आपलीच आहे. आजची पिढी भाग्यवान आहे असे विधान केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी व्हिएसएससीमधील ट्राइयोसोनिक ंिवड टनेल, तामिळनाडूतील महेंद्रगिरीमधील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्समधील सेमी क्रायोजेनिक इंटीग्रेटेड इंजिनासंबंधी विभाग आणि सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रामधील पीएसएललव्ही एकीकरण विभागाचे उद्घाटन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR