27.5 C
Latur
Wednesday, October 23, 2024
Homeराष्ट्रीयमानवी तस्करीप्रकरणी एनआयएचे १० राज्यांत छापे

मानवी तस्करीप्रकरणी एनआयएचे १० राज्यांत छापे

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवार दि. ८ नोव्हेंबर रोजी मानवी तस्करी प्रकरणी १० राज्यांमध्ये धडक करावाई केली. त्रिपुरा, आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, हरियाणा, पुद्दुचेरी, राजस्थान आणि जम्मू-काश्मीर राज्­यांमध्­ये तपास संस्­थेने छापे टाकले. ही कारवाई स्­थानिक पोलिसांच्­या मदतीने करण्­यात आल्­याचे एनआयएच्या सूत्रांनी स्­पष्­ट केले.

‘एनआयए’च्या अनेक पथकांनी पहाटे एकाचवेळी १० राज्यांमध्ये मानवी तस्­करीमध्­ये सहभागी असलेल्या संशयितांविरुद्ध छापे टाकण्यास सुरुवात केली. १० राज्­यांमध्­ये ५० हून अधिक ठिकाणी ही कारवाई करण्­यात आली. गेल्या महिन्यात बंगळूरू येथून ‘एनआयए’च्या पथकाने श्रीलंकेतील मानवी तस्करी प्रकरणात तामिळनाडूतील फरार आरोपी इम्रान खान याला अटक केली होती होती. त्­याने अन्­य आरोपींना मदत केली होती. श्रीलंकन नागरिकांची बेंगळुरू आणि मंगळुरू येथे विविध ठिकाणी तस्करी केल्­याचे तपासात उघड झाले होते. एनआयएने या प्रकरणातील पाच भारतीय आरोपींविरुद्ध प्राथमिक आरोपपत्र दाखल केले होते.

निष्पाप लोकांना आमिष
एनआयए इतर मानवी तस्करी प्रकरणांचा तपास करत आहे. ज्यात निष्पाप लोकांना तस्करांकडून खोटी आश्वासने देऊन आमिष दाखवले जाते, ज्यामध्ये कॅनडामध्ये रोजगारासाठी स्थलांतर करण्याबरोबच अन्­य आमिषांचाही समावेश असल्­याचे तपासात स्­पष्­ट झाले होते. याचा कारवाईचा पुढील भाग म्­हणून आज १० राज्­यांमध्­ये धडक कारवाई करण्­यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR