मुंबई : वृत्तसंस्था
सानिया मिर्झा हिच्यासाठी दोन आठवडे फार आनंददायी ठरले आहेत. सोशल मीडियावर सानिया फोटो पोस्ट करत सतत चाहत्यांच्या संपर्कात राहत आहे. दुबईत सानिया तिच्या जवळच्या व्यक्तींसोबत होती. यावेळी सानियाने गायक आतिफ असलम याचा परफॉर्मन्स देखील पाहिला.
दरम्यान, भारताची प्रसिद्ध आणि लोकप्रिय टेनिसपटू सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याला घटस्फोट दिल्यानंतर सानिया स्वत:च्या अटींवर आयुष्य जगत आहे. घटस्फोटानंतर सानिया सोशल मीडियावर अधिक सक्रिय आहे.
दरम्यान, आतिफ पाकिस्तानी गायक आहे. आतिफ याची गाणी सानियाला प्रचंड आवडतात.
आतिफ याच्यासोबत देखील सानियाने काही फोटो पोस्ट केले आहेत. घटस्फोटानंतर सानिया तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पतीची साथ सुटल्यानंतर सानिया तिच्या पाच वर्षांच्या मुलासोबत आनंदाने जगत आहे.
सांगायचे झाले तर, सानिया मिर्झा हिने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत, तर अनेक नवीन विक्रम रचले आहेत. आज सानियाला कोणत्याही ओळखीची गरज नाही. टेनिसविश्वात सानियाचं नाव फार मोठं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सानियाची चर्चा रंगली आहे.
सानियाच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, सानियाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब याला घटस्फोट दिल्यानंतर पाच वर्षांच्या मुलासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. घटस्फोटानंतर शोएब याने तिसरे लग्न केले. पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत शोएबने लग्न केले आहे. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले.