38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रनितीन गडकरी यांना संपविण्याचे षडयंत्र!

नितीन गडकरी यांना संपविण्याचे षडयंत्र!

संजय राऊत यांचा भाजपवर घणाघात

मुंबई : प्रतिनिधी
भाजपने लोकसभेसाठी कंबर कसली आहे. ४०० च्या पारचा नारा दिला आहे. लोकसभेसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नाही.

त्यावरून विरोधकांनी भाजपला घेरले आहे. नितीन गडकरींचा पत्ता आतापासूनच कट करण्याचे हे षडयंत्र आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ४ दिवसांपूर्वी गडकरी शेतक-यांबाबत स्पष्ट बोलले होते. मजूर आणि कष्टकरी हा दु:खी आहे. समाधानी नाही. कोणत्या मंत्र्याची स्पष्ट बोलण्याची हिंमत आज आहे का, असा सवाल त्यांनी सत्ताधारी मंत्र्यांना विचारला.

नितीन गडकरींना का डावलले हे आजच्या ‘सामना’च्या ‘संपादकीय’मध्ये स्पष्ट लिहिले आहे. नितीन गडकरी हे स्पष्टवक्ते आहेत. गडकरी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहेत. त्यामुळे ते दिल्लीची गुलामी पत्करणार नाहीत असा त्यांचा स्वभाव आहे.आम्ही त्यांच्यासोबत जवळून काम केले आहे. नितीन गडकरी विकासाला महत्त्व देतात, ते ढोंगबाजी आणि फसवणुकीला महत्त्व देत नाहीत. आज जो विकास दिसत आहे तो म्हणजे नितीन गडकरी सांभाळत असलेल्या मंत्रालयांचा आहे, असे राऊत म्हणाले.
भाजपला बहुमत नाही
२०२४ मध्ये भारतीय जनता पक्षाला अजिबात बहुमत मिळण्याची शक्यता नाही. भारतीय जनता पक्ष २२०, २२५ च्या पुढे जागा जिंकणार नाही.

नाना पटोले यांचा पण निशाणा
नितीन गडकरी यांचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत नाही, यावर काँग्रेसचे नाना पटोले यांनी पण चिंता व्यक्त केली. देशाचे मोठे नेते महाराष्ट्रात आहेत, भावी पंतप्रधान नितीन गडकरी असे असताना भाजपच्या यादीत त्यांचे नाव नाही हे चिंतेची बाब आहे. आता भाजपा पक्ष राहिला नाही तर तो मोदी परिवार झाला आहे, अशी टीका त्यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR