34.4 C
Latur
Monday, April 28, 2025
Homeलातूरपाटोदा हद्दीत प्राण्यांच्या अवयवामुळे दुर्गंधी

पाटोदा हद्दीत प्राण्यांच्या अवयवामुळे दुर्गंधी

जळकोट : जळकोट ते उदगीर राष्ट्रीय महामार्गावर जळकोट पोलीस ठाण्याच्या पाटोदा बुद्रुक हद्दीत प्राण्यांचे अवयव असलेला कचरा टाकला जात आहे . यामुळे रस्त्यावरून चालणा-या तसेच सकाळी मॉर्निंग वॉकला जाणा-या नागरिकांना उग्र वासाला सामोरे जावे लागत आहे .
जळकोट नगरपंचायतीची हद्द संपल्यानंतर लागलीच पाटोदा बुद्रुक ग्राम पंचायतीची हद्द सुरू होते . जळकोट शहरातील काही जण हे कचरा राष्ट्रीय महामार्गावरच आणून टाकत आहेत . यामध्ये कोंबड्यांचे पंख , तसेच बक-याचे अवयव या ठिकाणी आणून टाकले जात आहेत . विशेष म्हणजे हा कचरा चक्क राष्ट्रीय महामार्गावरच टाकला जात आहे. यामुळे नागरिकांना उग्र वासाला सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रीय महामार्गावर आरोग्याला बाधा पोहोचणारा असा कचरा टाकण्यास पाटोदा ग्रामपंचायतीने प्रतिबंध घालावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR