34.2 C
Latur
Tuesday, April 29, 2025
Homeलातूरऔराद शहाजनी येथील व्यापा-यांचा बेमुदत बंद

औराद शहाजनी येथील व्यापा-यांचा बेमुदत बंद

निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील औराद शहाजानी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापा-यानी बाजार समिती आवारात बाजार समिती मालकीची दुकाने नाहीत, रस्ते नाहीत तरीही व्यापारी शेतमालावर लाखोचा कर भरणा करण्यात येत आहे . यामुळे भौतिक सुविधा पुरविण्यात याव्यात  अशी मागणी करीत व्यापा-यांंनी आजपासून बेमुदत बंद पुकारला आहे.
     निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीचे रस्ते नाहीत . जागा नाही व्यापा-यांच्या तीन पिढ्या संपत आल्या तरी पण कुठलीच भौतिक सुविधा व्यापा-यांना देण्यात आली नाही. दरवर्षी लाखोंचा कर भरणा मात्र व्यापारी करतात. सध्या जे रस्ते आहेत ते उखडून मोठे खड्डे पडले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासूनची सातत्याने भौतिक सुविधांची मागणी केली जात आहे. रस्त्याअभावी बाजारात शेती माल घेऊन येणे जिकीरीचे झाले आहे. मालवाहू वाहनांचे पाटे तुटत आहेत. व्यापारी शेतक-यांना याचा फटका बसत आहे. भौतिक सुविधा द्यावयाच्या नसतील तर शेतमालाची कर आकारणी कमी करा अशी मागण्या करीत आडत खरेदीदार यांनी आज बाजारात सौदा काढला नाही दरम्यान व्यापा-यांची बैठक
घेऊन बाजार समितीचे सभापती नरंिसग बिरादार, उपसभापती शाहुराज थेटे यांना लेखी निवेदन  देण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR