40 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeनांदेडपोलिस असल्याचे सांगून लुबाडले

पोलिस असल्याचे सांगून लुबाडले

नांदेड : प्रतिनिधी
लोहा शहराकडे जाणा-या एका दांपत्याला घाटात अडवत त्यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख रुपयाला फसविल्याची घटना काल दि.५ मार्च रोजी लोहा तालुक्यात घडली. पोलिस असल्याची बतावणी करून त्यांनी या दांपत्याला लुबाडल्याचे स्पष्ट झाले.

लोहा तालुक्यातील गणातांडा (सावरगाव नसरत) येथील शेतकरी गिन्यादेव आमृ जाधव हे दि.५ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता लोहा शहराकडे जात होते. रजिस्ट्री ऑफीसमध्ये काम असल्याने आपल्या पत्नीला सोबत घेऊन दुचाकीवर जाधव दांपत्य निघाले. मंगरुळ घाटात आल्यानंतर समोरून आलेल्या दोन तरुणांनी जाधव यांना थांबवले. आम्ही पोलिस आहोत, तुमच्याकडे जे असेल ते द्या, अशी मागणी त्यांनी केली. रजिस्ट्री ऑफीसमध्ये व्यवहारासाठी जाधव यांनी रोख ५० हजार रुपये सोबत घेतले होते. समोर उभ्या असलेल्या दोघांनी पोलिस असल्याचे सांगितल्यानंतर गिन्यादेव जाधव व त्यांच्या पत्नीने जवळील रोख ५० हजाराची रोकड व हातातील दोन्ही अंगठ्या त्यांना दिल्या. जीवाच्या भितीपोटी जाधव दांपत्याने विरोध न करताच त्यांना रोकड व अंगठ्या दिल्या. यात एकूण एक लाख १ हजाराचा मुद्देमाल भामट्यांनी लांबवल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ क्षीरसागर हे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR