30.9 C
Latur
Saturday, May 10, 2025
Homeमहाराष्ट्रबारामतीचा उमेदवार सुप्रिया सुळे

बारामतीचा उमेदवार सुप्रिया सुळे

पुणे : सुप्रिया सुळेंचे संसदेतील काम बोलके आहे, त्यामुळे आज मी तुमच्यासमोर बारामतीचा उमेदवार जाहीर करीत असून सुप्रिया सुळे बारामतीतून लढणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली आहे.

संग्राम थोपटेंनी आपल्यासोबत राहावे, शरद पवार पाठिशी असल्यावर विकास काय असतो ते मी दाखवून देईन असेही ते म्हणाले. ते भोरमधील सभेत बोलत होते. सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील भोरमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी या सभेचे नियोजन केले होते. त्यामध्ये बोलताना शरद पवारांनी आपल्या पक्षाच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली. त्यामुळे बारामतीमध्ये आता सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे.

भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे वडील आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांचा गेल्या ४० वर्षांपासून राजकीय संघर्ष आहे. त्यांचा हा संघर्ष पुढच्या पीढीमध्ये म्हणजे अजित पवार आणि संग्राम थोपटेंमध्येही असल्याचे दिसून येत आहे. आता बदलत्या राजकारणाचा वेध घेत शरद पवारांनी भोरच्या सभेच्या आधी अनंतराव थोपटे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि हा ४० वर्षाचा संघर्ष मिटवला. त्यामुळे थोपटे यांचे वजन आता सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात पडणार हे निश्चित झाले असून त्यामुळे अजित पवारांची मात्र अडचण वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR