33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रचुनाव आयोग आता भाजपाचा ‘चूना लगाव’आयोग झालाय

चुनाव आयोग आता भाजपाचा ‘चूना लगाव’आयोग झालाय

संजय राऊतांची मोदी-शहांवर टीका

मुंबई : देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोयल यांचा राजीनामा स्वीकारला. अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर आता निवडणूक आयोगात दोन आयुक्तांची पदे रिक्त आहेत. गोयल यांच्या राजीनाम्यानंतर आता फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हेच या आयोगात आहेत. या सा-या घटनेनंतर, शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी चुनाव आयोगाला ‘भाजपाचा चूना लगाव’आयोग असल्याचा टोला लगावला.

‘निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा हा नैतिकतेच्या मुद्यावर दिलेला राजीनामा नाही. मुळात ती नेमणूकच अनैतिक होती. अशी व्यक्ती नैतिक कारणासाठी कशाला राजीनामा देईल. ज्यांनी नेमलं त्यांनीच त्यांना दूर केलं. त्याजागी आणखी एक नियुक्त व्यक्ती येईल. ते आता भाजपाचीच विस्तारित शाखा म्हणून काम करतायत असे वाटते. शेषन यांच्या काळातला निवडणूक आयोग आता राहिलेला नाही. चुनाव आयोग हा सध्या भाजपाचा चूना लगाव आयोग झालाय’, अशी जळजळीत टीका संजय राऊत यांनी केली.

‘निवडणूक आयोग हा भाजपाच्या वरिष्ठ नेतेमंडळींच्या आदेशानुसारच काम करतोय हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल दिल्या गेलेल्या निर्णयांवरून स्पष्ट झाले आहे. पक्षांतरविरोधी कायद्याची मोडतोड करून आयोगाला काही निर्णय घ्यायला लावले. तेव्हा भाजपाच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने धृतराष्ट्र बनून काम केले. निवडणूक आयुक्तांचा तडकाफडकी राजीनामा हा मोदी-शहांचा नवीन डाव असेल,’ असेही ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR