धाराशिव : प्रतिनिधी
पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने अट्टल दोघा दुचाकी चोरांना गजाआड केले आहे. त्यांच्या ताब्यातून लाखो रूपये किंमतीच्या ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई दि. ९ मार्च रोजी केली.
धारशिव जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्र्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या सुचनांप्रमाणे विशेष पथक रवाना झाले होते. या पथकामध्ये सपोनि अमोल मोरे, सपोनि सचिन खटके, पोहेकॉ विनोद जानराव, पोहेकॉ निंबाळकर, पोहेकॉ वाघमारे, पोहेकॉ सय्यद, पोना जाधवर, पोना ढागारे, पोकॉ अरसेवाड, चापोहेकॉ अरब, चापोहेकॉ लाटे यांचा समावेश होता. हे पथक दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढत असताना दि.९ मार्च रोजी पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती.
राम माधव भोसले रा. खानापूर वाशी ह.मु. पांगरी, ता. बार्र्शी, जि. सोलापूर याने धाराशिव जिल्हृयातील व परजिल्ह्यातील ब-याच दुचाकी चोरी केलेल्या असून तो सध्या पारडी फाटा येथे एक चोरीची दुचाकी घेवून थांबलेला आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने हे पथक बातमीच्या पारडी फाटा येथे गेले. त्यावेळी राम भोसले याला ताब्यात घेवून त्याच्या ताब्यात असलेली दुचाकी जप्त केली. त्या दुचाकीची खात्री केली असता ती पोलीस ठाणे धाराशिव शहर येथील असल्याची खात्री झाली.
तसेच त्याच्याकडे आणखीण सखोल चौकशी केली असता त्याने दारुच्या नशेत धाराश्वि शहर, येरमाळा, मुरुम, भूम येथून अनेक दुचाकी चोरी केलेल्या आहेत. तसेच मुरुड जि. लातूर येथे एक घरफोडी करुन तेथुन पण एक दुचाकी चोरी करुन आणलेली आह.सदर दुचाकीची चोरी केल्याची व त्या दुचाकी त्याने त्याच्या राहत्या घरी पांगरी येथे लपवून ठेवल्या असल्याचे सांगितले. या पथकाने आरोपीच्या रहात्या घरी जावून छापा मरला असता, त्या ठिकाणी आरोपीच्या ताब्यातुन एकुण १० चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. तसेच चोरीच्या दुचाकी जप्त करुन हे पथक धाराशिवकडे येत असताना माहिती मिळाली की, सौरभ चंद्रकांत शिंगाडे रा. बौध्द नगर, धाराशिव यांच्याकडे धाराशिव शहर ठाण्यातील गुन्ह्यातील एक होन्डा अॅक्टीवा ही दुचाकी जप्त केली आहे.
अशा एकुण ११ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपीकडून पोलीस ठाणे धाराशिव शहर गुन्ह्यातील होन्डा अॅक्टीवा, पोलीस ठाणे येरमाळा गुन्ह्यातील हिरो होन्डा स्प्लेंडर, येरमाळा पोलीस ठाणे येथील हिरो होन्डा स्प्लेंडर, पोलीस ठाणे मुरुम मधील एचएफ डिलक्स, पोलीस ठाणे भूम मधील होन्डा शाईन, पोलीस ठाणे मुरुड मधील होन्डा शाईन, तसेच आणखी ४ दुचाकी याच्या चेसीस नंबर व इंजिन नंबर वरुन त्या कुठल्या पोलीस हद्दीतुन आरोपीने चोरी केल्या आहेत याची खात्री करणे चालु आहे.
ही कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्र्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदशर््नाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, पोलीस हावलदार- विनोद जानराव, समाधान वाघमारे, अमोल निंबाळकर, हुसेन सय्यद, पोलीस नाईक नितीन जाधवर, बबन जाधवर, अशोक ढागारे, पोलीस अमंलदार रविद्रं आरसेवाड, चालक पोहेकॉ अरब, लाटे यांच्या पथकाने केली.