33.9 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeमहाराष्ट्रमराठा आंदोलनाचा पंकजा मुंडे यांना फटका

मराठा आंदोलनाचा पंकजा मुंडे यांना फटका

बीड : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एकाही राजकीय पक्षाच्या नेत्याला गावात प्रवेश करू न देण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला आहे. या अनुशंगाने अनेक गावांच्या वेशीवरच मराठा समाजाने बॅनर लावून पुढा-यांनी प्रवेश करू नये असे लिहिले आहे. याचा फटका आतापर्यंत अनेक पुढा-यांना बसला आहे. आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना वेशीतूनच परत पाठवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संवाद दौ-याच्या निमित्ताने शिरूर कासार तालुक्यातील गाठी भेटी घेत असताना बीडच्या खलापुरीमध्ये मराठा समाज बांधवांकडून विरोध करण्यात आला.

परिणामी पंकजा मुंडे यांना कार्यक्रम रद्द करून पुढे जावं लागलं. पंकजा मुंडे यांच्या गाडीसमोर मराठा समाजाने आंदोलन करत घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी सावरासावर करत मराठा बांधवांना समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर मराठा समाजाने माघार घेतली नाही. अखेर पंकजा मुंडे यांना वेशीतूनच माघारी परतावे लागले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR