35.8 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरएमआयएम लोकसभेच्या ६ जागा लढविणार

एमआयएम लोकसभेच्या ६ जागा लढविणार

छ. संभाजीनगर : लोकसभा निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. एमआयएम देखील राज्यात लोकसभेसाठी आपले उमेदवार उभे करणार असून ६ जागा लढवणार असल्याचे पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी मोठी घोषणा केली आहे.

दरम्यान, एमआयएम राज्यात सहा लोकसभेच्या जागांवर आपले उमेवार उभे करणार आहे. यासंदर्भात इम्तियाज जलील यांनी घोषणा केली आहे. ‘मी जनतेसमोर जाऊन सांगेन, मी काम केले नसेल तर मला मतदान करू नका, असे मोठे वक्तव्य यावेळी जलील यांनी केले आहे. एमआयएम राज्यात केवळ सहा जागा लढवणार असल्याचा खुलासा देखील त्यांनी यावेळी केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमचेही काही संघटना आणि पक्षांशी बोलणे सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू आणि मुसलमान हाच निवडणुकीचा प्रमुख मुद्दा असेल असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता यावेळी लोकसभा निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यातील दोन प्रमुख पक्षात फूट पडली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आता एमआयएम देखील सहा जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR