27.4 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeलातूरचाकूरचा पाणीपुरवठा बंदसाठी नळेगाव कडकडीत बंद

चाकूरचा पाणीपुरवठा बंदसाठी नळेगाव कडकडीत बंद

नळेगाव: वार्ताहर
घरणी प्रकल्पातून चाकूरला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात यावा, या मागणीसाठी नळेगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.  चाकूर तालुक्यातील शिरूर अनंतपाळ, नळेगाव व परिसरातील ४० गावांसाठी वरदान ठरलेल्या तसेच शेतीत सिंचनाच्या माध्यमातून समृद्धी आणणा-या घरणी मध्यम प्रकल्पातील पाणी चाकूरला नेण्याचा घाट सुरू आहे. घरणी मध्यम प्रकल्पाची क्षमता २५.५४ दशलक्ष घनमीटर असून शिरूर अनंतपाळसह नळेगाव व परिसरातील ४० गावांना बारमाही पाणीपुरवठा करण्यात येतो.
 या प्रकल्पावर परिसरातील दोन ते तीन हजार शेतकरी अवलंबून आहेत. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोस्थान महाभियान अंतर्गत नगर पंचायत चाकूर येथील प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेकरीता घरणी मध्यम प्रकल्प तालुका शिरूर अनंतपाळ येथून पाण्याचा हक्क मागणीचा प्रस्ताव जलसंपदा विभाग यांच्याकडे मा. कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजी नगर यांच्याकडून मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. तो उपसचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन यांनी मंजूर केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR