31.7 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा

नाशिक लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा

नाशिक : आज मंगळवार दि. १२ मार्च रोजी शिवसेनेच्या वतीने नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत मोठी घोषणा केली आहे.

नाशिक लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. हेमंत गोडसेंना तिस-यांदा खासदार म्हणून निवडून आणायचे आहे, दुसरे कोणाचे नाव नसल्याचे वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. महाराष्ट्रातून महायुतीचे ४५ खासदार आणायचे आहे आणि त्यात गोडसे पण असतील, असे त्यांनी म्हटले आहे. नाशिकमधून शांतिगिरी महाराज हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतली होती. त्यांच्या भेटीनंतर हेमंत गोडसेचे तिकीट कट होणार का? असा सवाल उपस्थित होत होता. मात्र आता श्रीकांत शिंदेंनी एकप्रकारे हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केल्याने आता भाजप आणि राष्ट्रवादी यावर काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

यावेळी श्रीकांत शिंदे म्हणाले की, या मेळाव्याला चार वाजेपासून लोक आले आहेत. मला यायला उशीर झाला. हेमंत आप्पा तुमचा धनुष्यबाणच नाशिकला राहणार आहे. हेमंत गोडसेंना पुन्हा एकदा तिस-यांदा लोकसभेवर पाठवायचे आहे. आपले काम बघून विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे. गद्दार, खोके म्हणतात पण वेळ होती तेव्हा तुम्ही घरी बसून राहिलात. कोणता मुख्यमंत्री इर्शाळवाडीत डोंगर चढून जातो ते अजूनही स्वत:ला कार्यकर्ता समजतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR