मुंबई : अभिनेत्री अदा शर्मा सध्या तिच्या आगामी ‘बस्तर द नक्सल स्टोरी ’या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर रिलीज करण्यात आले आहे. त्याला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. अशातच प्रदर्शनापूर्वी नुकताच ‘बस्तर द नक्सल स्टोरी’ या चित्रपटाची स्क्रीनिंग जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू)आयोजित केली होती त्यादरम्यान विद्यार्थ्यांनी चांगलाच राडा केला आणि बस्तरची स्क्रीकनंग रोखण्याचा प्रयत्न झाला.
‘बस्तर द नक्सल स्टोरी’ हा चित्रपट १५ मार्चला प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी या चित्रपटाची स्क्रीनिंग जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आयोजित केली होती. यावेळी चित्रपटाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि निमार्ते विपुल अमृतलाल शाह, दिग्दर्शक सुदिप्तो सेन आणि मुख्य अभिनेता अदा शर्मा यांनीही या स्क्रीनिंग वेळी हजेरी लावली होती. मात्र, या स्क्रीनिंगदरम्यान जेएनयूमध्ये बराच गोंधळ झाला. एसएफआय या विद्यार्थी संघटनेच्या १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला आणि बस्तर द नक्सल स्टोरीचा प्रयोग रोखला. यासोबतच एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी ज्या सभाग्रहात या चित्रपटाची स्क्रीनिंग आयोजित केली होती, त्या सभागृहाचे दिवेही तोडले.
‘बस्तर द नक्सल स्टोरी’ हा चित्रपट नक्षलवादावर आधारीत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी चित्रपटाला प्रोपगंडा म्हटले आहे. मात्र, अदाने यावर आपले मत मांडले आहे. अदा म्हणाली की, जेव्हा तुम्ही बस्तरमध्ये आयपीएस नीरजा माधवन सारख्या कठोर पोलिसाची भूमिका पाहताल तेंव्हा तुम्हाला टीका करण्यासाठी जागा राहणार नाही असे अदा म्हणाली.