बार्शी: तालुक्यातील वालवड येथे शंभू महादेव ज्ञान प्रबोधिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
शंभू महादेव ज्ञान प्रबोधिनी बहुउद्देशीय संस्था ,अखंड हरिनाम सप्ताह तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गावातील नागरिकांना मोफत आरोग्य शिबिरात जवळजवळ अडीचशे ते तीनशे रूग्णांना औषध उपचार मोफत तपासणी देण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन जनरल फिजिशियन /सर्जन डॉ. रणजित हनुमंत जाधवर पाटील यांच्या पत्नी त्वचारोग तज्ञ डॉ. मोनिका केदार -जाधवर पाटील, दंतरोग तज्ञ डॉ. तृप्ती पाटील यांनी रूग्णांची तपासणी केली. यावेळी बार्शी तालुक्याचे माजी आमदार दिलीप सोपल यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी माजी मुख्याध्यापक हनुमंत जाधवर पाटील , ग्रामपंचायत सदस्य शकुंतला पाटील, कांचन जाधवर पाटील, शशिकांत दराडे, कृषी अधिकारी संतोष दराडे, अंगद जाधवर, राजेंद्र जाधवर , पंडित पाटील, श्रीराम जाधवर, ग्रामपंचायत सदस्य संतोष जाधवर, सौ. मनीषा जाधवर- पाटील दराडे, अशोक जाधवर, उमेश मुंडे , सतीश जाधवर, धनाजी भालेराव उपस्थित होते.