सोलापूर – उत्तर सोलापूर पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी मुख्याध्यापक वैजिनाथ हत्तुरे यांचा श्री मल्लिकार्जुन हायस्कूल येथे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मजरेवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सिद्धप्पा वरनाळ होते.
याप्रसंगी धरेप्पा हत्तुरे, प्राथमिकचे मुख्याध्यापक सचिन जाधव, पर्यवेक्षक गिरमल्ला बिराजदार, बसवराज कोरे,लक्ष्मीकांत पनशेट्टी, गंगाराम घोडके, सविता कुलकर्णी, अण्णाराया तुप्पद यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिलकुमार गावडे यांनी केले. सूत्रसंचालन मारुती माने यांनी तर आभार रमेश आगवणे यांनी मानले.