31.7 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रश्रीकांत शिंदेंनी शिस्त पाळावी

श्रीकांत शिंदेंनी शिस्त पाळावी

नाशिक : हेमंत गोडसे हे नाशिकचे महायुतीचे उमेदवार असतील, कामाला लागा असे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सभेत म्हटले होते. यावरून भाजपा त्यांच्यावर अधिकार नसल्याची टीका करत असताना आता महायुतीतील आणखी एक मित्रपक्ष राष्ट्रवादी देखील श्रीकांत शिंदे यांना अधिकार नसल्याचे म्हणत आहे.

नाशिकची जागा जाहीर करण्याचा श्रीकांत यांना काही अधिकार नाही. राजकारणामध्ये थोडी शिस्त ही सगळ्यांनी पाळली पाहिजे, अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे यांना फटकारले आहे. तसेच मनसे महायुतीमध्ये आल्यास फायदा होईल का, नाही यावर माझा अभ्यास नसल्याचेही त्यांनी सांगितले. शरद पवारांचा फोटो वापरत असल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला झापलेले असताना भुजबळ यांनी आम्ही शरद पवारांचा फोटो कुठेही वापरलेला नाही असे सांगितले. परंतु, चिन्ह सध्या आमच्याकडे आहे, त्यामुळे आम्ही ते वापरणारच असेही ठणकावले आहे.

मी स्वत: शरद पवार यांचे फोटो कुठेही वापरले नाही. शरद पवार यांचे फोटो दाखवा आणि मत मिळवा मी असे कुठेही म्हणालो नाही. प्रचार करण्यासाठी अजून वेळेच आली नाही. निवडणुका अजून लागल्या नाहीत, असेही भुजबळ म्हणाले. शरद पवारांनी कृषिमंत्री असताना कांद्याला का हमीभाव दिला नाही? त्यांच्या काळात देखील कांद्याचे भाव पडले होते. आता कांद्याचे दर पडले आहेत हे खरे आहे. असे भुजबळ यांनी कबूल केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR