27.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात रचला दोन राज्यांत बॉम्बस्फोट घडविण्याचा कट

पुण्यात रचला दोन राज्यांत बॉम्बस्फोट घडविण्याचा कट

पुणे : पुणे दहशतवाद प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांनी कट रचला होता. दोन्ही राज्यात बॉम्बस्फोट घडवण्याच्या कट पुण्यात रचला गेला. पुण्यातील कोंढवा भागात राहत असलेल्या एका घरात बॉम्ब तयार करण्याचे दहशतवाद्यांनी प्रशिक्षण घेतले होते. मागील वर्षी अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एनआयएने बुधवारी पुणे इसिस शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त केल्याप्रकरणी पहिले पुरवणी आरोपपत्र दाखल केले, आणखी चार आरोपींची नावे दिली आणि एकावर आरोप जोडले. मोहम्मद शाहनवाज आलम, रिझवान अली, अब्दुल्ला शेख, तल्हा लियाकत खान अशी चार आरोपींची नावे आहेत. मागच्या वर्षी दोन दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. एनआयए या प्रकरणाचा तपास करत आहे. एनआयएकडून याप्रकरणी आणखी चार दहशतदादांच्या विरोधात मुंबई विशेष न्यायालयात पूर्व आणि आरोपपत्र दाखल केले. सर्व आरोपी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे सदस्य असून ते दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे. पुणे आणि महाराष्ट्रात दहशत पसरवण्याच्या मोठ्या कटात हे सर्व सामील होते.

तपासात असेही आढळून आले की, आरोपी गुप्त कम्युनिकेशन अ‍ॅप्सद्वारे परदेशात असलेल्या त्यांच्या हँडलर्सच्या संपर्कात होते. ते सशस्त्र दरोडे आणि चोरी करून दहशतवादी निधी गोळा करत होते आणि त्यांच्या नापाक योजना राबवण्यासाठी त्यांच्या हस्तकांकडून पैसेही मिळवत होते.

आयईडी बॉम्ब बनविण्याचे घेतले प्रशिक्षण
हे आरोपी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट रचत होते. या लोकांनी पुण्यातील कोंढवा येथे आयईडी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते आणि नियंत्रित स्फोटही घडवून आणला होता. आरोपींनी ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट रचला होता त्या ठिकाणांचा शोध घेतला होता. आरोपींचा महाराष्ट्र आणि गुजरातमधील विविध महानगरांमध्ये गुन्हे करण्याचा कट होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR