37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeधाराशिवदगडधानोरा येथील एकाची तोतया पोलिसांकडून फसवणूक

दगडधानोरा येथील एकाची तोतया पोलिसांकडून फसवणूक

धाराशिव : प्रतिनिधी
जिल्ह्यात फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. पोलिस असल्याचे भासवून भामटे ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करीत आहेत. हातचलाखी करून सोन्याचे दागिने लंपास करीत आहेत. अशीच एक फसवणुकीची घटना उमरगा तालुक्यातील तुरोरी गावाजवळ घडली. एका कर्मचा-याचे तोतया पोलिसांनी दोन तोळ््याचे सोन्याचे लॉकेट लंपास केले. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाणे येथे दि. १४ मार्च रोजी चौघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहेय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमरगा तालुक्यातील दगडधानोरा येथील राजू भाऊराव शिंदे (वय ५२) दि. १४ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तुरोरी गावाला नोकरीसाठी जात होते. ते राष्ट्रीय महामार्गावर भागीरथी धाब्याच्या पुढे आले असता चार अनोळखी व्यक्तींनी दोन दुचाकीवर येवून राजू शिंदे यांना अडवले. पोलीस अधिकारी असल्याची बतावनी करुन तुमचे दुचाकी चालविण्याचे लायसन व कागदपत्र दाखवा म्हणाले. गाडीची कागदपत्रे बघून झाल्यानंतर त्यांच्या गळ्यातील २ तोळ्याचे सोन्याचे लॉकेट गळ्यातुन काडून खिशात ठेवण्यास सांगितले. गळ्यात लॉकेट घालून कुठे फिरता असे म्हणून त्या चार भामट्यांनी हातचलाखीने शिंदे यांचे सोन्याचे लॉकेट लांबविले. या प्रकरणी राजू शिंदे यांनी दि.१४ मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पोलीस ठाणे उमरगा येथे भा.दं.वि.सं. कलम- १७०, ४१९, ३४ अंतर्गत चौघांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR