22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयबॉयलर फुटल्याने भीषण स्फोट; ४० कामगार जखमी

बॉयलर फुटल्याने भीषण स्फोट; ४० कामगार जखमी

रेवाडी : हरियाणातील रेवाडी येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका स्पेअर पार्ट्स बनवणा-या कंपनीच्या कारखान्याच्या आवारातच बॉयलर फुटल्याने कंपनीत काम करणारे ४० हून अधिक कर्मचारी होरपळले आहेत, त्यांना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.

हरियाणातील रेवाडी येथील धरुहेरा औद्योगिक परिसरात ही दुर्घटना घडली. लाईफ लाँग फॅक्टरीत बॉयलरचा स्फोट होऊन ४० कामगार जखमी झाले. यामध्ये अनेक कर्मचारी गंभीररीत्या भाजले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तसेच अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.

स्पेअर पार्ट्स बनवणा-या रेवाडीच्या लाईफ लाँग फॅक्टरीत हा अपघात झाला. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये ४० कर्मचारी जखमी झाल्याचा दावा केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR