18.7 C
Latur
Wednesday, December 25, 2024
Homeक्रीडास्मृतीच्या नेतृत्वात आरसीबीचा विजय

स्मृतीच्या नेतृत्वात आरसीबीचा विजय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) ने चमकदार कामगिरी केली आणि महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. रविवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेलेल्या या अंतिम सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा (डीसी) आठ गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात आरसीबीला दिल्ली कॅपिटल्सने अवघ्या ११४ धावांचे लक्ष्य दिले होते, ते आरसीबीने २ गडी गमावून १९.३ षटकांत पूर्ण केले व डब्ल्यूपीएल २०२४ ची स्ट्रॉफी आपल्या नावावर केली.

रविवारी अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून डब्ल्यूपीएलची पहिली ट्रॉफी जिंकली. ट्रॉफी स्वीकारताना कर्णधार मानधनाने आपल्या संघातील सर्वात तरुण खेळाडू श्रेयंका पाटीलला आघाडीवर ठेवून संपूर्ण संघाने विजय साजरा केला.या विजेतेपदानंतर महिला संघावर पैशांचा वर्षाव झाला. विजेत्या आरसीबीला बक्षीस म्हणून ६ कोटी रुपये मिळाले. तर उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सला बक्षीस म्हणून ३ कोटी रुपये मिळाले.

युवा श्रेयंका पाटीलची चमकदार कामगिरी
दरम्यान, डब्ल्यूपीएलच्या अंतिम सामन्यात २१ वर्षीय युवा श्रेयंका पाटीलने आपल्या संघससाठी अप्रतिम गोलंदाजी केली. आरसीबीसाठी ती सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने ३.३ षटकात १२ धावा देत चार विकेट्स घेतल्या. याशिवाय श्रेयंका महिला प्रीमियर लीगच्या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेऊन चमकदार कामगिरी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR