38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeराष्ट्रीयभारतीय बँकांवर सायबर हल्ल्याचा धोका वाढला!

भारतीय बँकांवर सायबर हल्ल्याचा धोका वाढला!

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना सायबर हल्ल्यांमुळे निर्माण होणा-या धोक्याचा सामना करण्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. तसेच बँकांना सुरक्षा वाढवण्यास सांगितले आहे. आरबीआयने सांगितले की, तपासणीमध्ये कुठेही त्रुटी असतील तर त्यावर काम करा.

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी. रबी शंकर यांनी आधीच सांगितले होते क.ी बँकिंग क्षेत्राला नवीन सायबर सुरक्षा धोक्यांसाठी तयार राहण्याची गरज आहे. ग्राहकांचा आणि इतर गोष्टींचा विचार करायला हवा, असे ते म्हणाले होते.

‘एआय’च्या गैरवापराचे धोके ओळखण्यासाठी आणि कमी करण्यासाठी बँकांना त्यांच्या एनक्रिप्टेड सिस्टमची पुनर्रचना करावी लागेल यावर त्यांनी प्रकाश टाकला. ते पुढे म्हणाले की, आपल्याला ‘एआय’मधील समस्या देखील समजून घेणे आवश्यक आहे.

डिजिटल बँकिंग वाढल्याने सायबर हल्ल्यांचे धोकेही वाढले आहेत. यासाठी सायबर आणि आयटीचा स्वतंत्रपणे आढावा घेण्याची गरज आहे. रिझर्व्ह बॅँकेचे तपासणी पथक सर्व बँकांच्या आयटी प्रणालीची तपासणी करते.

अलिकडच्या वर्षांत बँकिंग प्रणालीमध्ये सायबर सुरक्षा हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर आरबीआयकडून हा इशारा देण्यात आला आहे. भारतीय बँकांनी जून २०१८ ते मार्च २०२२ या कालावधीत हॅकर्सकडून २४८ डेटांच्या चोरीची नोंद झाली आहे.

भारत सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार २४८ पैकी ४१ प्रकरणे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील आहेत तर खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये २०५ प्रकरणांची नोंद झाली आहे. तसेच परदेशी बँकांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR