17.5 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयहिमाचलमध्ये २५०० कोटींचा क्रिप्टो घोटाळा; १८ आरोपींना अटक

हिमाचलमध्ये २५०० कोटींचा क्रिप्टो घोटाळा; १८ आरोपींना अटक

५ हजार सरकारी कर्मचाऱ्यांसह १ लाख बळी

शिमला : हिमाचलमध्ये २५०० कोटी रुपयांच्या क्रिप्टो करन्सी घोटाळ्यात ५ हजार सरकारी कर्मचाऱ्यांसह एक लाख लोकांची फसवणूक झाली आहे. आतापर्यंत ४ पोलिस कर्मचाऱ्यांसह १८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच १२ कोटी रुपयांची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. टेरर फंडिंगची शक्यता पाहता केंद्रीय यंत्रणांकडूनही मदत मागवण्यात आली आहे. तथापि, आता हिमाचलचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांच्या म्हणण्यानुसार, या क्रिप्टो करन्सी घोटाळ्यातले ५०० कोटी रुपये वसूल होणार नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रिप्टो करन्सी फसवणुकीचा मास्टरमाईंड सुभाष शर्मा २०० कोटी रुपये कमवून दुबईला पळून गेला होता. त्याला भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ५००० सरकारी कर्मचाऱ्यांनीही क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवले होते. काहींनी तर नोकरीही सोडली. फेअरलेनमधील जमिनीचा मोबदला मिळालेल्यांचे पैसेही या फसवणुकीत गुंतवले गेले. याप्रकरणी पोलिस लवकरच चालान जारी करणार आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ८० मोबाईल जप्त केले आहेत.

क्रिप्टो करन्सी घोटाळ्यात पोलिसांनी आतापर्यंत १८ आरोपींना अटक केली आहे. १२ कोटी रुपयांची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. पैसे दुप्पट करण्याच्या लालसेपोटी एक लाख लोकांची फसवणूक झाली आहे. यामध्ये ५ हजार सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या घोटाळ्यात पोलिस कर्मचारीही सहभागी होते. एसआयटीने २ कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या ४ पोलिसांना अटक केली आहे. मार्चमध्ये ८ जणांच्या तक्रारीवरून एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. आतापर्यंत ३०० जणांनी तक्रारी केल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR