कोलकाता : इंग्लंड पाकिस्तान च्या आजच्या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आहे. आणि इंग्लंडचा हाच निर्णयानं पाकिस्तानचा संघ हा सामना सुरु होण्यापूर्वीच आता वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. पाकिस्तानच्या संघासाठी हा सामना सर्वात महत्वाचा आहे. कारण पाकिस्तान संघाला हा सामना जिंकण्यासह रन रेटही न्यूझीलंडपेक्षा जास्त ठेवायचा आहे, तरच त्यांना सेमी फायनलमध्ये पोहोचता येणार आहे. पण सामना होण्यापूर्वीच पाकिस्तानच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता पाकिस्तानच्या संघाला नवीन टार्गेट देण्यात आले आहे. त्यानुसार पाकिस्तानच्या संघाने जर प्रथम फलंदाजी केली तर त्यांना २८७ धावांनी विजय मिळवावा लागणार आहे. पण जर पाकिस्तानची प्रथम गोलंदाजी आली तर काय होणार, याचे समीकरणही समोर आले आहे. त्यामुळे या सामन्यासाठी टॉसचे महत्व अधोरेखित झाले आहे.
पाकिस्तानने टॉस जिंकला तर ते प्रथम फलंदाजीच स्विकारतील. पण जर इंग्लंडच्या संघाने टॉस जिंकला तर पाकिस्तानला प्रथम गोलंदाजी करावी लागू शकते. या परिस्थितीत पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहोचणे अवघड जाऊ शकते. कारण जर पाकिस्तानची या सामन्यात प्रथम गोलंदाजी आली तर त्यांना इंग्लंडच्या संघाला २८४ चेंडू राखून ऑल आऊट करावे लागेल. या गोष्टीचा अर्थ असा होतो की, पाकिस्तानला इंग्लंडला ऑल आऊट करण्यासाठी फक्त १६ चेंडू मिळतील. त्यामुळे पाकिस्तानसाठी ही अवघड गोष्ट समजली जात आहे.
इंग्लंडने या सामन्यात टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता पाकिस्तानचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यातच जमा आहे. कारण त्यांना १६ चेंडूंत इंग्लंडला काही ऑल आऊट करता येणार नाही. त्यामुळे आता पाकिस्तानच्या संघाचा गेम ओव्हर झाला आहे, असे म्हटले जात आहे. पण याबाबतची अधिकृत माहिती आयसीसीने दिलेली नाही.