नवी दिल्ली. राष्ट्रीय राजधानीत शनिवारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून १० किलोमीटर आत होता. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.६ इतकी मोजण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (एनसीएस) ही माहिती दिली. एनसीएसनुसार, शनिवारी दुपारी २.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर दिल्लीत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.