पुणे : आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा घोटाळा झाला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी केला. तर अँब्यूलन्स खरेदीत५३९ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला, असे म्हणत त्यांनी तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला.
यावेळी जिवंत खेकडा दाखवला हा खेकडा आरोग्य विभागाला पोखरणा-या खेकड्याचा प्रतीक असल्याचं रोहित पवार म्हणाले. रोहित पवारांनी केला आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा घोटाळा असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी केला.
रोहित पवार आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा घोटाळा झाला याला आरोग्य मंत्री जबाबदार आहेतच एक तर त्यांनी त्यांची खुर्ची सोडावी त्यांचे पद सोडावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. ही फाईल पुढे पास कशी केली. देवेंद्र फडणवीस साहेबांकडे ही फाईल जाते. त्यांमी दुर्लक्ष केलं का? साडेसहा हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे कोण जबाबदार आहे? असा प्रश्न आमच्या सगळ्यांचा आहे, असं ते म्हणाले.