24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर धडाडणार उद्धव ठाकरेंची तोफ

नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर धडाडणार उद्धव ठाकरेंची तोफ

शिंदे, पवार, शहा यांच्याही होणार जाहीर सभा

नाशिक : लोकसभा निवडणूक प्रचारासाठी नाशिक गोल्फ क्लब मैदानावर उद्धव ठाकरे, अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे. या मैदानावर आजवर अनेक दिग्गज नेत्यांनी सभा गाजवल्या आहेत.

दरम्यान, राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुतीसह, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभांनी नाशिकचे गोल्फ क्लब मैदान गाजणार आहे. या मैदानात १५ ते १८ मे रोजी सभा होणार आहेत. १५ मे रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. त्यानंतर १६ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, १७ मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, १८ मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभांचे आयोजन गोल्फ क्लब मैदानावर करण्यात आले आहे.

नाशिकमधील लोकसभा निवडणुकीला अद्याप दोन महिने वेळ असला, तरी राजकीय पक्षांकडून पूर्वतयारी केली जात आहे. महायुतीसह, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जाहीर सभांसाठी विशेषत: गोल्फ क्लब मैदानाला पसंती मिळत आहे. राजकीय पक्षांनी आतापासूनच या मैदानाच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली आहे. नेत्यांच्या जाहीर सभांसाठी मैदान मिळावे, यासाठी महानगरपालिकेच्या जाहिरात विभागाकडे अर्ज सादर करण्यात येत आहेत.

गोल्फ क्लब मैदान इतिहास
थंड हवामानामुळे ब्रिटिशांनी गोल्फ खेळण्यासाठी नाशिकची निवड केली होती. त्या काळात आशियातील सर्वांत मोठं नाशिकचं गोल्फ मैदान होतं. यानंतर १९९७ मध्ये शिवसेनेचे पहिले महापौर वसंत गिते यांच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची याच नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर भव्य सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी हे गोल्फ क्लब मैदान नसून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान असल्याचे म्हटले होते. त्यानंतर नाशिक महापालिकेने या मैदानाचे नामकरण हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR