कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेसला टार्गेट केले जात आहे. हा एक जनतेचे मन विचलित करण्याचा प्रयत्न आहे. देशपातळीवर फोडाफोडीचे पेटंट फक्त भाजपाकडे आहे. भाजपाने पक्ष फोडण्याचा ट्रेडमार्क घेतला आहे, त्यामुळे तो दुस-या कुणाला लागू होऊ शकत नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या बदललेल्या भूमिकेचे राज्यातल्या जनतेला देखील आश्चर्य वाटत आहे. राज ठाकरे महायुतीमध्ये जाऊन दोन-चार जागा लढवतील असे वाटले होते. मात्र, निवडणूकच लढवायची नाही ही भूमिका मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील मान्य झाली असेल असे वाटत नाही, असे म्हणत राज ठाकरे यांच्यामध्ये इतकं का परिवर्तन झालं हे कळायला मार्ग नाही, असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे.
त्याचबरोबर, राज्यात फोडाफोडीचे राजकारण झाले त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची वक्तव्यं संपूर्ण जनतेने ऐकली आहेत.