23.7 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeराष्ट्रीयउत्तरप्रदेशात ‘बसप’ भाजपला मदत करणार!

उत्तरप्रदेशात ‘बसप’ भाजपला मदत करणार!

मुस्लिम मतांच्या प्रभावाकडे सा-याच राजकीय पक्ष नेत्यांचे लक्ष; मतविभाजनाचा भाजपला फायदा होणार

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम मतांचा प्रभाव किती पडणार, या मुद्द्याची चर्चा अधिक गांभीर्याने होत आहे. विशेषत: रामपूर, मुरादाबाद, संभल याशिवाय पश्­िचम उत्तर प्रदेशमधील इतर मतदारसंघांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिल्लीत सरकार स्थापनेसाठी अत्यंत महत्त्वाचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात ८० मतदारसंघ मिळून १५कोटी ३४ लाख पात्र मतदार आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपने ६२ तर, त्यांचा मित्र पक्ष असलेल्या अपना दलाने दोन जागा जिंकून सप-बसप-काँग्रेसला धूळ चारली होती. त्यातल्या त्यात बसपला १० जागा मिळाल्या होत्या. समाजवादी पक्षाला पाच आणि काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले होते.

मुस्लिम मतांची अधिक टक्केवारी असलेल्या राज्याच्या पश्चिम भागात त्यांना चांगले यश मिळाले होते. यंदा मात्र राजकीय समीकरणे बदलली आहेत. मागीलवेळी आघाडी करून लढलेल्या ‘बसप’ने यंदा स्वबळाची परीक्षा पाहण्याचा निर्णय घेतला आहे, तर पश्चिम भागात प्रभाव असलेल्या राष्ट्रीय लोक दलाने भाजपला साथ दिली आहे. सप आणि काँग्रेस मात्र एकत्रितपणे लढत आहेत.

पहिल्या टप्प्यात मतदान असलेल्या आठ मतदारसंघांमध्ये सरासरी ३० टक्के मुस्लिम मतदार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत या भागातील एकूण मतदारसंघांपैकी चार ठिकाणी ‘बसप’ने विजय मिळविला होता, तर तीन ठिकाणी ‘सप’ला यश मिळाले होते. मुझफ्फरनगर, कैराना, मेरठ, बुलंदशहर, बागपत आणि अलिगड या ठिकाणी भाजपला मतविभाजनाचा फायदा झाला होता. यंदा मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान झाले तरच सप व काँग्रेसला यश मिळेल, अशी परिस्थिती आहे.

सप-काँग्रेसला च्ािंता
मागील तीन ते चार वर्षांपासून मुस्लिमांच्या प्रश्­नांवर समाजवादी पक्षाने आवाज उठविला नाही. त्यामुळे त्यांच्यावर हे मतदार नाराज आहेत. स्वतंत्रपणे लढणा-या ‘बसप’ने अनेक ठिकाणी मुस्लिम उमेदवाराला उभे केले . त्यामुळे मतविभाजन होण्याचा धोका आहे. त्यातच जाट मते भाजपच्या बाजूने जाण्याची दाट शक्यता असल्याने मागील निवडणुकीपेक्षा यंदा भाजपला अधिक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. समाजवादी पक्षाला मात्र हा तर्क मान्य नसून मुस्लीम समाज आपल्याच बाजूने ठामपणे उभा आहे, अशी या पक्षाच्या नेत्यांची धारणा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR