बंगळुरू : कर्नाटकातील उडुपी शहरात एक महिला आणि तिच्या तीन मुलांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. यामध्ये एक एका १२ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. या गुन्ह्यामागच्या कारणाचा तपास सुरू असून संशयित अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेनंतर उडुपी येथील रहिवाशांना धक्का बसला आहे.
उडुपीतील तृप्ती नगरजवळील एका घरात पहिल्या कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. १२ वर्षांचा मुलगा आवाज ऐकून खोलीत शिरला होता आणि कोणताही पुरावा राहू नये म्हणून हल्लेखोरांनी त्याला ठार मारले.
शेजारच्या एका मुलीने पोलिसांना सांगितले की, गोंधळ पाहून ती बाहेर आली होती, पण संशयितांनी तिला धमकावले. हसीना (४६) तिचा २३ वर्षीय मुलगा अफगानी, २१ वर्षांची आयनाज आणि १२ वर्षांचा मुलगा या मृतदेहांची ओळख पटली आहे.
चाकूने जखमी झालेल्या हसीनाच्या सासूवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उडुपीचे पोलीस अधीक्षक अरुण कुमार यांनी पत्रकारांना सांगितले की, चार जणांची हत्या करण्यात आली आहे व एक जण जखमी आहे. हसीना आणि तिच्या तीन मुलांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. तिच्या सासूला गंभीर दुखापत झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम्ही घटनास्थळी भेट दिली असून तपास करू आणि लवकरच दोषीला पकडण्यासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणाले.