22.6 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रपत्नीच्या मारहाणीत बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू

पत्नीच्या मारहाणीत बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू

पुणे: वाढदिवस दुबईला साजरा केला नाही, तसेच वाढदिवसाला मनासारखं गिफ्ट का दिले नाही या कारणावरून पती-पत्नीत भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात पत्नीने केलेल्या माराने बांधकाम व्यावसायिक असलेल्या पतीचा मृत्यू झाला. पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला.

निखिल पुष्पराज खन्ना (वय 36) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. तर पत्नी रेणुका निखिल खन्ना (वय 38) हिला वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल आणि रेणुका या दोघांचा सहा वर्षापूर्वी प्रेम विवाह झाला होता. सप्टेंबर महिन्यात पत्नी रेणुका हीचा वाढदिवस होता. वाढदिवसाला दुबईला का घेऊन गेला नाही. आणि मनासारखे गिफ्ट मिळाले नाही. म्हणून पत्नी रेणुका नाराज होती. यावरून दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. आज दुपारी सुद्धा दोघांमध्ये याच कारणावरून भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात पत्नी रेणुका हिने पतीच्या तोंडावर ठोसा मारला. यामध्ये निखिल हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात देण्यात आले मात्र त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीनंतर पत्नी रेणुका खन्ना हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वानवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR