34.4 C
Latur
Monday, March 17, 2025
Homeराष्ट्रीय‘झेलम’मध्ये बोट बुडाली, १० विद्यार्थ्यांसह अनेक बेपत्ता

‘झेलम’मध्ये बोट बुडाली, १० विद्यार्थ्यांसह अनेक बेपत्ता

 

श्रीनगर : बटवार येथील झेलममध्ये प्रवाशांनी भरलेली बोट बुडाली. या बोटीमध्ये १० ते १२ शालेय विद्यार्थ्यांसह अनेक जण प्रवास करत होते. चार दगावल्याची माहिती असून अनेक जण बेपत्ता आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले आहे.

अनेक विद्यार्थी आणि स्थानिकांना घेऊन गंडबाल ते बटवारा, श्रीनगरला जाणारी एक बोट आज पहाटे मध्य काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातील बटवारा भागाजवळ झेलम नदीत उलटली. जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये झेलम नदीत बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR