न्यूयॉर्क : नवीन नास्त्रेदमस नावाने ओळखल्या जाणा-या क्रेग हॅमिल्टन यांनी अमेरिकेवर मोठी नैसर्गिक आपत्ती येणार असल्याचे भाकित केले आहे.
नवीन नास्त्रेदमस नावाने ओळखल्या जाणा-या क्रेग हॅमिल्टन पार्कर यांनी अमेरिकेवर मोठ संकट येणार असल्याचे भाकित केले आहे. पुढील वर्षी अमेरिकेत मोठा भूकंप किंवा नैसर्गिक आपत्ती येणार असल्याची भविष्यवाणी पार्कर यांनी केली आहे. भविष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अमेरिकेतील अनेक शहरे नष्ट होतील, असे क्रेग हॅमिल्टन पार्कर यांनी म्हटले आहे. नैसर्गिक संकटामुळे अमेरिकेतील बहुतेक भागात ब्लॅक आऊट होईल. अनेक शहरांमध्ये अंधार होईल. मोठे नैसर्गिक संकट किंवा आपत्तीमुळे अनेक शहरांमधील वीज पुरवठ्याशी संबंधित पायाभूत सुविधा नष्ट होतील, परिणामी सर्वत्र ब्लॅक आऊट होईल.
अमेरिकेसाठी नव्या नास्त्रेदमसची भविष्यवाणी
क्रेग हॅमिल्टन पार्कर यांना नवे नास्त्रेदमस नावाने ओळखले जाते. क्रेग हॅमिल्टन पार्कर यांनी त्यांच्या ‘कॉफी विद क्रेग’ या यूट्यूब चॅनलवर नवा व्हीडीओ अपलोड करत अमेरिकेबाबत धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. यूट्यूब चॅनलवरील व्हीडीओमध्ये त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेत मोठा विध्वंस होणार आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया आणि टेक्सासमध्ये मोठा ब्लॅकआउट होणार आहे.
अमेरिकेत भूकंपामुळे शहरे उद्ध्वस्त होतील
२०२४ मध्ये अमेरिकेत अनेक मोठे भूकंप होतील, असा दावा क्रेग यांनी भविष्यवाणीत केला आहे. यामुळे पश्चिम किनारपट्टीवर अनेक शहरे नष्ट होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. क्रेग यांनी म्हटले आहे की, मला दिसत आहे की पश्चिम किनारपट्टीपर्यंत प्रचंड भूकंप आणि नैसर्गिक घटना घडतील, ज्यामुळे बरेच काही नष्ट होणार आहे. २०२४ मध्ये जे काही होईल ते हृदय पिळवटून टाकणारे असेल.